राज्यातील गारठा पुन्हा वाढला

पुणे- गेल्या दोन दिवसांपासून हवामानात पुन्हा बदल झाला असून शहर आणि परिसरातील गारठ्यात एकदम वाढ झाली आहे. पुणे शहरात शनिवारी ७.१ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांतही थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र पुन्हा थंडी राहणार आहे.

राज्याेत सर्वत्र गेल्या दोन दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली आहे. पारा पुन्हा १० अंशांच्या खाली घसरला असूनराज्यातील गारठा पुन्हा वाढला, गेल्या महिन्याप्रमाणेच पुणेकरांना हुडहुडी भरली आहे. किमान तापमानात शनिवारी एकदम दोन अंशाची घट झाली. परिणामी , पहाटे आणि सकाळीही बोचरे वारे वाहात होते. पुढील दोन दिवसांतही थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून, किमान तापमान १० अंशांपेक्षा कमीच राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

राज्यातही ब-याच भागांत थंडीचा जोर वाढला आहे. राज्यातील नीचांकी ६.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद नाशिक येथे झाली. सातारा, नगर, मालेगाव येथेही थंडीत वाढ झाली आहे. आगामी काळात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र पुन्हात थंडी राहणार आहे.