टीम इंडिया न्यूझीलंडला रवाना

मुंबई- टीम इंडिया दोन टेस्ट आणि पाच वन-डेच्या सीरिजसाठी न्यूझीलंडला रविवारी सकाळी रवाना झाली. परदेशताल्या उसळत्या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी आजवर नेहमीच निराशाजनक झाली आहे. त्यामुळे आगामी काळात टीम इंडियाची न्युझिलंड दौ-यावर कामगिरी कशी राहणार याकडे लक्ष लागले आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ सालचा वर्ल्डकप होत आहे. त्यादृष्टीने टीम इंडियासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

न्युझिलंडला जाण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला, संघात काही नवे खेळाडू आहेत. त्यांची कामगिरी सध्या चांगली आहे. त्यामुळे ही एक आव्हानात्मक सीरिज होईल; शिवाय आगामी वर्ल्डकप न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत असल्यामुळे युवा खेळाडूंना तिथल्या विकेटचा अनुभव मिळेल. मात्र आता आमची टीम स्थिर झाली असून आता आम्ही कोणत्याही मैदानावर चांगली कामगिरी करु असा विश्वास वाटतो.

न्यूझीलंडचा हा दौरा टीम इंडिया सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग या दिग्गजांच्या अनुपस्थितीमध्ये पहिलाच दौरा आहे. त्यामुळे या दौ-यात यंगिस्तानची चांगलीच कसोटी असेल. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ सालचा वर्ल्डकप होत आहे. त्यादृष्टीने टीम इंडियासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या विश्वचषकाच्या तयारीसाठी हा दौरा महत्वपूर्ण आहे, असे धोनीने म्हटले आहे.

Leave a Comment