यश बिर्ला ग्रुपच्या २० ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे

मुंबई -आयकर विभागाच्या तपास पथकाने करचुकवेगिरीच्या संशयावरून यश बिर्ला ग्रुपच्या मुंबई आणि दिल्लीतील २० ठिकाणांवर एकाचवेळी छापे घातले आहेत. यश बिर्ला ग्रुपमधील पाच कंपन्यांतील अकौंट बुक्स आयकर अधिकार्‍यांनी ताब्यात घेतली असून येत्या दोन तीन दिवसांत करचुकवेगिरीसंबंधाचे चित्र स्पष्ट होईल असे वरीष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र कोणत्या कंपन्यांच्या कार्यालयावर हे छापे घातले त्याची माहिती देण्यास नकार दिला.

बिर्ला ग्रुप भारतातील १५० वर्षे जुना उद्योग समुह असून त्यांच्या व्यवसायाची उलाढाल ३ हजार कोटींच्या घरात आहे. ऑटो, इंजिनिअरिंग स्टील पाईप्स, मशीन टूल्स, आयर्न कास्टींग, पंप, इलेक्ट्रोनिक्स उपकरणे याबरोबरच आरोग्य, लाईफस्टाईल, शिक्षण, पर्यटन तसेच आय.टी. क्षेत्रातही हा उद्योगसमूह कार्यरत आहे. त्यांच्या नऊ कंपन्या पब्लिक लिस्टेड आहेत.