रणजी सामन्याचा दबाव नाही- अंकित बावणे

औरंगाबाद – मुंबईविरुद्ध सुरू झालेल्याय रणजी ट्रॉफीतील उपांत्य लढतीत आम्ही कोणताही दबाव न घेता खेळणार आहोत. मुंबई संघात वसीम जाफर, जहीर खानसारखे खेळाडू असले तरी महाराष्ट्रण संघही चांगला फॉर्मात असल्याने ही उपउपात्येपूर्व लढत आम्ही जिंकून बाजी मारणार असल्याचे महाराष्ट्राचा रणजीपटू अंकित बावणेने स्पपष्ट केले.

याबाबात पुढे बोलताना अंकित बावणे म्हणाला की, मुंबईविरुद्ध महाराष्ट्र या महत्त्वाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. रणजीच्या विजेतेपदाकडे पोहोचण्यासाठी ही शेवटची व अत्यंत अवघड पायरी असल्याने संपूर्ण ताकद या लढतीत लावणार आहे. कर्णधार रोहित मोटवाणी, केदार जाधव जबरदस्त फॉर्मात आहेत. आमच्या फलंदाजांच्या मधल्या फळीने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्यावर संघाची मदार आहे.

गेल्या काही दिवसांपसून मुंबईचा संघ बलाढ्य समजला जात असला तरी आम्ही त्यासाठी काही खास रणनीती तयार केलेली नाही. प्रत्येक खेळाडूने आपापले काम जबाबदारीने पार पाडण्याचे ठरवले असून फलंदाज धावा काढतील तर गोलंदाज बळी घेतील, असे साधे गणित समोर ठेवले आहे. हा सामना किती महत्त्वाचा आहे, याची प्रत्येकाला जाण आहे. त्यामुळे संपूर्ण संघ मैदानावर केवळ जिंकण्यासाठीच खेळतील असेही बावणे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment