पुण्यात बजाज अलियांझची पहिली महिला शाखा

पुणे – बँकांचा पावलावर पाऊल टाकत खासगी विमा क्षेत्रातील कंपनी बजाज अलियांझने पहिली महिला शाखा पुण्यात सुरू केली आहे. यात महिला एजंटाना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. असा उपक्रम राबविणारी बजाज अलियांझ ही देशातील  पहिली कंपनी आहे.

या संबंधी माहिती देताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तपन सिघल म्हणाले की महिला व्यावसायिकांचा गट हे आमचे पहिले लक्ष्य आहे. ज्या महिलांना घरातील जबाबदार्‍यांमुळे नोकरी करणे शक्य नाही अशा महिलांवर आम्ही लक्ष केंद्रि्रत केले आहे. या शाखांमुळे त्यांना पुन्हा करियर सुरू करण्याची संधी प्राप्त होणार आहे त्याचवेळी त्या आपली कौटुंबिक जबाबदारीही पार पाडू शकणार आहेत. पुण्यातील पहिली शाखा पाच महिला कर्मचार्‍यांसह सुरू करण्यात आली असून त्यासाठी १० महिला एजंटांची नियुक्तीही केली गेली आहे. या नंतर अन्य मेट्रो शहरातूनही अशा शाखा सुरू केल्या जाणार आहेत.