
न्यूयॉर्क – अमेरिकी न्यायालयात शिख समुहाने १९८४ च्या दंगलीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मानवाधिकार उल्लंघन केल्याचा आरोप करून लावलेला दावा काढून टाकला जावा अशी विनंती सोनिया गांधी यांनी संबंधित न्यायालयात अर्ज करून केली असल्याचे समजते. इतकेच नव्हे तर या दंग्यांसंबंधातील कोणताही नवा दावा त्यांच्याविरोधात दाखल करून घेतला जाऊ नये अशीही विनंती सोनियांनी न्यायांलयाला केली आहे.
अमेरिकी न्यायालयात काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे सोनियांचे वकील रवी बात्रा यांनी सोनियांची सही असलेले ८५ पानी जबाबपत्र न्यूर्यार्कच्या इस्टन जिल्हा कोर्टात दाखल केले आहे. त्यात सोनियांविरोधात शीख समुहाने दाखल केलेला दावा काढला जावा कारण तो या न्यायालयाच्या न्यायकक्षेत येत नसल्याचे म्हटले गेले आहे. शीख समुहाने १९८४ च्या शीखविरोधातील दंगलीत आरोपी असलेल्या काँग्रेस नेत्यांना संरक्षण दिल्याचा आणि त्यंचा बचाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.