डॉक्टर मारहाण प्रकरणाची सीआयडी चौकशी: गृहमंत्री

सोलापूर – शासकीय रुग्णालयात झालेल्या मारहाणीप्रकरण सीआयडीकडे सोपवू. तसंच तिन्ही आरोपी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यात येईलं असं आश्वासनं, राज्य सरकारने दिलं आहे. मंगळवारी शासकीय रुग्णालयात झालेल्या मारहाणीविरोधात निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. संपामुळे अनेक रूग्णांचे हाल झाले आहेत.

याप्रकरणी राज्य सरकारनं आपली भूमिका जाहीर करावी, त्यानंतरच डॉक्टरांच्या संपाबाबत निर्णय घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. यावर पोलीस आणि डॉक्टर मारहाणप्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. तसंच तिन्ही आरोपी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यात येईलं असं आश्वासनंही सरकारनं दिलं आहे.