मुंबई – शूटिंगासाठी पुण्याला गेलीली अभिनेत्री अलका पुणेवार गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. मराठी अभिनेत्रीची गाडी खोपोलीजवळच्या दरीत चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत सापडली आहे. मात्र या गाडीमध्ये अलका नसल्याने, तिच्या बेपत्ता होण्याचे गुढ अधिक वाढले आहे.
अलका पुणेवार २७ डिसेंबरला एका सिनेमांच्या शूटिंगासाठी पुण्याला गेली होती. मात्र त्यानंतर कुटुंबियांचा तिच्याशी संर्पक होऊ शकलेला नाही. अलकाचे पती संजय पुणेवार यांनी २७ डिसेंबरला तिला ठाणे रेल्वे स्थानकाजवळ सोडले होते. तिथून ती एका खासगी गाडीने शूटिंगसाठी जाणार होती.
अलकाशी संर्पक होत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी अखेर ३० डिसेंबरला ठाण्यातील खोपरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. खोपोली पोलिसांना तपासा दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेस वे जवळच्या दरीत एक गाडी चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत सापडली.या गाडीमधून अलका प्रवास करत होती. मात्र गाडी सापडली त्यावेळी अलका त्यामध्ये नव्हती. तिचा मोबाईल गाडीपासून काही अंतरावर सापडला. त्यामुळे या प्रकरणी गूढ अधिक वाढले आहे. पोलिसांनी आता मोबाईलवरीलफोनच्या आधारे तपास सुरु केला आहे. अलकाने बवंडर, गदर, तुझसे लगी लगन आणि काही मालिकांमध्ये काम केले आहे.