मायकल शूमाकरला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना

पॅरिस: चार दिवसांपूर्वी स्कीईंग करताना दगडावर डोके आपटून झालेल्या अपघातात शूमाकरच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्याच्या मेंदूवर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, तो अजूनही बेशुद्धावस्थेत असल्यायचे समजते. भारतात सर्वत्र गाजेलेल्या फॉर्म्युला वनच्या माजी विश्वविजेत्या मायकल शूमाकरला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे म्हणून त्याचे जगभरातले चाहते प्रार्थना करीत आहेत.

शुक्रवारी दिवसभर अधिक तीव्रतेने प्रार्थना करत आहेत. शूमाकरचा आज ४५ वा वाढदिवस आहे. शूमाकरचा जन्मदिन एरव्ही त्याच्या लाखो चाहत्यांसाठी मोठ्या आनंदाचा दिवस असतो. पण शूमाकरच्या आजच्या वाढदिवसावर त्याला नुकत्याच झालेल्या अपघाताचे सावट आहे. फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत स्कीईंग करताना गंभीर अपघात झालेला हा स्पोर्टस आयकॉन, सध्या जगण्यासाठीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी रेस लढतोय.

शूमाकर कोमातून लवकरात लवकर बाहेर यावा आणि त्याला सर्वसामान्य आयुष्य जगता यावं म्हणून त्याचे जगभरातले चाहते प्रार्थना करत आहेत. शूमाकरच्या वाढदिवसाचे ओचित्यर साधून सर्वत्र प्रार्थना सभेचे आयोजन करयात आले आहे. वाढदिवसावर त्याला नुकत्याच झालेल्या अपघाताचे सावट आहे.

Leave a Comment