वीजदराच्या मुद्द्यावरून भाजपवर तोफ

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वीजदराच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपलेली आहे. त्यारतच आता काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी मात्र भाजपवर तोफ डागली आहे. भाजपने त्यांच्या काळात रिलायन्सची दलाली केल्यामुळे आजची दरवाढ पाहावी लागत आहे, असा सनसनाटी आरोप त्यां नी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

वीज दरवाढीबाबत आक्रमक झालेल्या संजय निरुपम यांनी भाजपवरती तोफ डागली. निरुपम यांनी वीजदरवाढीबाबत सरकारने निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत विचार करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र निरुपम यांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा राजकीय खळबळ माजली आहे. दरम्यान वीजदराच्या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे.

मंत्रिमंडळाच्याग बैठकीत वीजदर कमी करण्याच्या मुद्दयावरून चांगलीच खडाजंगी झाली. गृहमंत्री आर आर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आम आदमी पक्षाचा आदर्श घ्यावा, असे म्हणत चांगलेच खडसावले. आम आदमी पक्षाने जे दोन दिवसांत करून दाखवले ते आपल्याला दोन महिन्यांतही जमलं नाही, असा सनसनाटी टोला आर. आर. पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांना लगावला.