मरीन ड्राइव्हवर होणार प्रजासत्ताकदिनाचे संचलन

मुंबई – दिल्लीतील राजपथावर होणार्यास शानदार संचलनाप्रमाणेच यंदापासून मरीन ड्राईव्हवर प्रजासत्ताकदिनाचे संचलन केले जाणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले आहे. ते म्हणाले दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. येथेही राजपथाप्रमाणेच प्रजासत्ताकदिनाचे संचलन केले जावे असा विचार अनेक वर्षे सुरू होता. आत्तापर्यंत राज्यात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम शिवाजी पार्कवर केला जात होता.

मरीन ड्राईव्ह हा अर्धवर्तुळाकार रस्ता क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखला जातो. नरीमन पॉईंटपासून बाबुलनाथ मलबार हिल जोडणारा हा रस्ता मुंबईतील सर्वात शानदार रस्ता मानला जातो. या रस्त्यावर होणार्‍या संचलनात सामील होणार्‍या रथांसाठी पारितोषिकेही दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकाला ५० लाख , दुसर्‍या क्रमांकाला २५ लाख तर तिसर्‍या क्रमांकाला १५ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.