झाडूची ऑनलाईन विक्री सुरू

दिल्ली – आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या झाडूची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. परिणामी व्यापारी लोकांनीही त्यापासून फायदा उठविण्यासाठीची पावले उचलली आहेत. ई कॉमर्स कंपनी प्लेस ट्रेडस डॉट कॉमने झाडूच्या लोकप्रियतेचा फायदा उठवत पाच रूपयांत झाडूची विक्री ऑनलाईन सुरू केली आहे.

कंपनीचे मु्ख्य अधिकारी मुदित खोसला सांगतात आम्ही पहिल्या १ हजार ग्राहकांना पाच रूपयांत झाडू विकणार आहोत. नंतर मात्र त्याची किंमत वाढविली जाणार आहे. झाडूमुळे सर्व नागरिकांना भ्रष्टाचार मुक्त दिल्ली या अभियानात सामील होण्याची संधी मिळणार आहे. झाडू सध्या बदल आणि इमानदारीचे प्रतीक बनला आहे. त्यामुळे सर्वांनी याच इमानदार किमतीत झाडू खरेदी करावा अशी आमची इच्छा आणि प्रयत्न आहे.

Leave a Comment