मुंबई – सोलापूर येथील व्हीएमएमसी वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरला मारहाण करणा-या पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांच्यासह तीन जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस आय़ुक्त प्रदीप रासकर यांनी दिली.

३१डिसेंबरला सोलापूर येथे निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सुमारे साडेचार हजार डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. मारहाण केलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या संघटनेने केली होती. याआधीही मे मध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन मार्ड संघटनेने संप पुकारला होता.