इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सुनावणीसाठी न्यायालयात निघालेल्या मुशर्रफ यांच्या छातीत अचानक दुखू लागले त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी मुशर्रफ न्यायालयात जात होते. सुरक्षेचे कारण देते मुशर्रफ यापूर्वी दोनवेळा सुनावणीसाठी गैरहजर राहिले होते. त्यामुळे यावेळी हजर होण्यासाठी न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. मुशर्रफ यांची १९९९ ते २००८ या काळात पाकिस्तानात सत्ता होती. मुशर्रफ यांच्या विरोधात देशद्रोहाचा आणि दिवगंत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येचा खटला सुरु आहे.