बिग बॉसचा विजेता आज ठरणार

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बिग बॉस या रियलिटी शोचा शनिवारी रात्री ग्रैंड फिनाले आहे. या शो मध्ये-आता केवळ चार फायनालिस्ट उरले आहेत. त्यामध्ये अभिनेत्री तनिषासह संग्राम, गौहर आणि एजाज या चार जणांचा समावेश आहे. या चार जणांपैकी एक जण बिग बॉस-७ चा विजेता ठरणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षक कोणाला जास्त वोट देतात तोच या बिग बॉस-७ या शो चा विजेता ठरणार आहे.

बिग बॉस-७ चा आज ग्रैंड फिनाले आहे. त्या निमित्त शानदार कायक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभिनेता सलमान खान अभिनेत्री एली एबराम सोबत खास परफॉमेंस सादर करणार आहे. त्या सोबतच बिग बॉस-७ मध्ये् काही काळ सहभागी झालेली छोटया पडद़यावरील अभिनेत्री प्रत्यूषा आणि काम्या पंजाबी हे देखील सलमानच्या सोबत थिरकणार आहेत.

बिग बॉस-७ या रियलिटी शोचा ग्रैंड फिनाले एकूण तीन तास चालणार आहे. यामध्येल बिग बॉस मधून नुकताच बाहेर पडलेला एंडी आणि अरमान कोहली देखील यावेळी परफॉर्म करणार आहेत. त्यामुळे बिग बॉस-७ चा विजेता ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.