खंडणीखोर महिला पीएसआयला बेड्या ठोकल्या

नागपूर : बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन कॉलेज विद्यार्थ्यांकडून खंडणी वसूल करणाºया दोन पोलिसांना गजाआड करण्यात आले आहे. पीएसआय सोनाली वगारे आणि पोलीस शिपाई विष्णू खेडकर अशी या दोघांची नावे आहेत. २६ तारखेला पहाटे ४ वाजता विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी कॉलेजात शिकणारी एक युवती आणि युवक नागपूर बस स्टँडला उतरले. रिक्षावाल्याने तिप्पट भाडं मागितल्यानं दोघांनी चालतच होस्टेल गाठायचे ठरवले. मात्र लॉ कॉलेज चौकात सुनीता वगारे आणि विष्णू खेडेकरने दोघांना अडवून दमदाटी केली.

प्रवासाचं तिकीट आणि ओळखपत्र दाखवूनही पोलीस दोघांना सोडायला तयार नव्हते. अखेर सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर सुनीता वगारे आणि विष्णू खेडेकरनं त्यांच्याकडील १३०० रुपये काढून घेतले. त्यानंतर पोलीस वाहनात बसवून जवळच्या स्टेट बँकेच्या एटीएममधून ३ हजार २०० रुपये काढून घेतले. घाबरलेल्या तरुणांनी याची माहिती मित्र आणि कुटुंबियांना दिल्यानंतर त्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली. विशेष म्हणजे सुनीता वगारेचा अजून प्रोबेशनचा कालावधीही संपलेला नाही.

Leave a Comment