अॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयाची संधी

मेलबोर्न- अॅशेस मालिकेतील चौथा कसोटीत ऑफस्पिनर नॅथन लियॉनने पाच बळी घेतल्यावने इंगलंडचा डाव अवघ्याच १७९ धावांत गुंडाळला गेला आहे. त्यामुळे आता सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी बेजबाबदार फटकेबाजी केल्या्मुळे ऑस्ट्रेलियाला विजयाची नामी संधी चालून आली आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला १७९ धावांमध्येच गुंडाळले असून विजयासाठी आता त्यांना २३१ धावांची गरज आहे. शेवटचे बातमी हाती आली तेंव्हा त्यााने बिनबाद २७ धावा केल्या होत्या.

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लियॉनने पाच बळी घेतले. तर मिशेल जॉन्सडनने तीन फलंदजांना तंबुत पाठविले. इंग्लंयडने ऑस्ट्रेिलियाला पहिल्याा डावात रोखून ५१ धावांची आघाडी मिळविली होती. त्या नंतर कर्णधार अलिस्टंर कुक आणि मायकल कार्बेरी यांनी ६५ धावांची सलामी देऊन चांगली सुरुवात करुन दिली होती. परंतु, इंग्लं डच्यार खेळाडुंनी बेजबाबदार फटके मारुन विकेट्स फेकल्यास. त्यामुळे मोठी आघाडी घेता आली नाही.

नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारण्यााच्या नादात केविन पीटरसन, बेन स्टोलक्सा, इयन बेल हे फलंदाज ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाले. तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाचा यष्टी‍रक्षक ब्रॅड हॅडीन याने दमदार फलंदाजी करत ६५ धावांची झुंझार खेळी केली. त्याने अखेरच्या विकेटसाठी लियॉनसोबत ४० धावा जोडून इंग्लंडची आघाडी कमी केली आहे. ऑस्ट्रेेलियाने इंग्लंडला १७९ धावांमध्येच गुंडाळले असून विजयासाठी आता त्यांना २३१ धावांची गरज आहे. शेवटचे बातमी हाती आली तेंव्हा त्याने बिनबाद २७ धावा केल्या होत्या.

Leave a Comment