शांघाय – जनरल मोटर्स आणि एसएआयसी मोटर कार्पोरेशनने संयुक्त प्रकल्पात तयार झालेल्या ब्यूक आणि शेव्हरोलेट मॉडेल्सपैकी १५ लाख कार सुरक्षेच्या कारणास्तव बाजारातून परत घेतल्या असून ऑटो उद्योगातील हा सर्वात मोठा रिकॉल असल्याचे सांगितले जात आहे. या कार च चीनमधील स्थानिक उत्पादन प्रकल्पात तयार करण्यात आल्या होत्या.
या गाड्यांसंदर्भात जनरल मोटर्सने इशारा दिला होता की यातील दोषपूर्ण पार्ट दीर्घ काळ वापराने क्रॅक होण्याची शक्यता आहे व त्यामुळे इंधन गळतीचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे या गाड्या परत घेण्यात येत आहेत. शांघाय येथील कन्सल्टींग फर्म ऑटो फोरसाईटचे प्रमुख येल झांग यांनी या संदर्भात सांगितले की या दोन्ही मॉडेल्स चीनमधील मेन स्ट्रीम कार्स आहेत व त्यामुळे त्यांच्या रिकॉल केलेल्या गाड्यांचा आकडाही मोठाच आहे. अर्थात ही दोन्ही मॉडेल्स चीनमध्ये लोकप्रिय असल्याने या रिकॉलचा कंपनीच्या रेप्युटेशनवर कांहीही परिणाम होण्याची शक्यता नाही. या कंपनीने जानेवारी ते नोव्हेंबर २०१३ या काळात२८ लाख ९० हजार गाड्यंची विक्री केली आहे.
यापूर्वी फोर्ड मोटर्स आणि चाग्ला ऑटो कंपनीने संयुक्त प्रकल्पात बनविलेल्या ८१ हजार गाड्या स्टीअरिंग प्रॉब्लेममुळे परत घेतल्या होत्या.