‘धूम-३’ चा पाकिस्तानमध्ये व धुमधडाका

गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच प्रदर्शित झाल्या पासून बहूचर्चित ‘धूम-३’ ची सर्वत्र बॉक्स-ऑफिसवर धूमधडाक्यात चर्चा सुरू आहे. भारताप्रमाणेच आता गेल्याप काही दिवसांपासून पाकिस्तानमध्येही धूम-३ने आतापर्यंतचे विक्रम मोडीत काढले असून त्याठिाकणीही या सिनेमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

प्रदर्शित झाल्यापासून पाकिस्तानमधील सिनेमागृहांत धूम-३चे दिवसातून लागोपाठ चक्क पाच वेळा स्क्रिनिंग होत आहे. यावरूनच पाकिस्तानमधील धूम-३चा क्रेझ लक्षात घेण्यासारखी आहे. पाकिस्तानची राजधानी कराचीमधील एकूण ५६ चित्रपटगृहांमध्ये धूम-३ने पहिल्याच दिवशी तब्बल २० कोटींची कमाई केली आणि तेथील याआधीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. गेल्याच महिन्यात पाकिस्तानात ‘वार’ या सिनेमाने पहिल्याच दिवशी ११.४ कोटींची कमाई केली होती.

त्यानंतर आता धूम-३ने जवळपास साडेआठ कोटींच्या फरकाने पुढचे पाऊल टाकत नवा विक्रम केला. मुख्यम्हणजे, एकाच दिवशी लागोपाठ एकाच सिनेमाचे पाच शो दाखविले जाणे हे ‘पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री’ने आजवर अनुभवलेले नाही. “धूम-३ यावेळी सुपरहिट ठरणार यामागे नक्कीच कोणतीही शंका नाही.