गोंदियातील चार्टर्ड विमानाचा अपघात, एकाचा मृत्यू

गोंदिया: गोंदियाच्या बेरसी एअरपोर्टवरुन उड्डाण केलेले एक चार्टर्ड विमान बेपत्ता झाले होते. या विमानाचा अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. या अपघातग्रस्त विमानाचे काही अवशेष मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातल्या डेलाखेडी या गावात सापडले आहेत. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. दरम्यान, या अपघाताच्या कारणांचा उलगडा मात्र अजूनही झालेला नाही. या अपघातात प्रशिक्षणार्थी वैमानिक सोहेल अन्सारी याचा मृत्यू झाला.

गोंदियातल्या विमान प्रशिक्षण संस्थेच्या या विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारी डीएस फोर्टी नावाच्या विमानासह उड्डाण केले होते. काही वेळातच या विमानाचा संपर्क तुटला होता. बुधवारी सकाळी या विमानाचा अपघात झाल्याचे उघड झाले आहे.

अपघातात मरण पावलेला हा विद्यार्थी रायबरेलीचा होता. या विद्यार्थ्यांच गोंदियातील राष्ट्रीय अकॅडमीमध्ये ट्रेनिंग होते. डायमंड ४० या विमानातून तो तीन तासांच्या फ्लाईंगसाठी निघाला होता. मात्र उड्डाणानंतर विमानाचा संपर्क तुटला. दरम्यान, या अपघाताच्या कारणांचा उलगडा मात्र अजूनही झालेला नाही.

Leave a Comment