
पणजी – सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल याच्या कोठडीत 4 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तेजपाल याला सुनाविण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज (सोमवार) संपल्याने त्याला पणजी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला आणखी बारा दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
