भाजपची भूमिका लोकशाहीनुसार नाही- भूषण

बंगळूर – दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळूनही ते सरकारच्या बाहेर राहणार आहेत. ही परिस्थिती लोकशाहीला धरून नाही, अशी टीका आम आदमी पक्षाचे (आप) नेते प्रशांत भूषण यांनी केली. निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांविषयी बंगळूरमध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

आम आदमी पक्षाची काँग्रेसशी होणारी आघाडी ही लोकशाहीनुसार नाही. मात्र, आमच्या पक्षाला सरकार स्थापन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असे भूषण म्हणाले. दिल्लीत निर्माण झालेली स्थिती टाळण्यासाठी प्रमाणबद्ध प्रातिनिधिक व्यवस्था हाच एकमेव मार्ग होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.