चेतेश्वर पुजाराची कसोटी क्रमवारीत घसरण

दुबई – आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली. जागतीक कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. आर. अश्विनने पाचव्या क्रमांकावरील त्याचे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.

सध्या सुरु असलेल्या भारत द. आफ्रिके दरम्यानच्या पहिल्या कसोटीमध्ये शतक झळकावलेल्या विराट कोहालीची फलंदाजीमध्ये पहिल्या वीसमध्ये जागा कायम आहे. गोलंदाजीमध्ये प्रग्यान ओझा आठव्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने अँशेस मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने ११ वे स्थान मिळवले आहे.

पाच सामन्यांच्या अशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० अशी आघाडी घेऊन मालिका जिंकली. तिस-या सामन्यात डेविडने अनुक्रमे ६० आणि ११२ धावा केल्या. त्याचबरोबर पर्थ येथील शतक केलेल्या शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ आणि इंग्लंडच्या बेन स्टोक्स यांच्याही क्रमवारीत सुधारणा झाली आहे. द. आफ्रिकेचे एबी डेविलियर्स आणि हाशिम आमला अव्वल स्थानावर कायम आहेत.