उलगडला सचिनच्या आठवणींचा पट

पुणे : माझ्या चित्रपट कारकीदीला पन्नास वर्षे पूर्ण झाली. यासगळयात सातत्याने आजुबाजूच्या परिस्थितीचे केलेले निरीक्षण महत्वाचे ठरले. स्मरणशक्ती चांगली असली तरी जाणीवपूर्वक ‘गलत चींजो को भूल जाना’ हे मात्र कधी ही विसरलो नाही. बेभरवशाचे क्षेत्र म्हणून पाहिल्या जाणार्‍या चित्रपट व्यवसायाकडे मी कायमच विदयार्थ्याच्या भूमिकेतून पाहत आल्याने मला यशस्वी होता आले, असे आपल्या चित्रपट कारकीदीच्या यशस्वीपणाविषयी सांगताना अभिनेते सचिन पिळगावकर यांनी आपला पहिला चित्रपट हा माझा मार्गएकला ते एकुलती एक या चित्रपटांदरम्यानच्या आठवणींचा प्रवास उलगडला.

मेहता पब्लिशिंग हाउसच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या सचिन पिळगावकर लिखित ‘हाच माझा मार्ग’ या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या चित्रपट सृष्टीतील सुवर्णमय कारकीर्दीचा वेध सचिन दिलखुलास या कार्यक‘मात प्रसिध्द मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पिळगावकर यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी सचिन यांनी आपल्या चित्रपटांमधील वेगवेगळया आठवणींना श्रोत्यांसमोर उजाळा दिला.

कागज के फूल या गुरुदत्त यांच्या चित्रपटाने आपल्या मनात दिग्दर्शन होण्याची इच्छा तयार झाली. आई-वडील यांचा कायमच मला मिळणारा पाठींबा प्रोत्साहन देणारा ठरला. चित्रपटातील अनेक दिग्जांबरोबर काम करण्याच्या आठवणींविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले, जुन्या लोकांकडे देण्यासारखे खूप काही होते. आता या व्यवसायाय सगळा कंजुष लोकांचा भरणा आहे. राजा परांजपे, राजा ठाकूर, ग.दि.माडगुळकर, सुलोचनादीदी यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले. संजीव कपूर, ‘यातनाम गीतकार साहीर लुधियानवी यांच्याबरोबरच्या मंतरलेल्या रात्री खूप काही देवून गेल्या.

शोले या चित्रपटातील किस्सा सांगताना ते म्हणाले, या चित्रपटात काम करत असताना अमिताभ बच्चन यांना मी माहित नव्हतो. मात्र त्यांच्या आईच्या हस्ते मला पारितोषिक मिळाले आहे व त्यांनी मला मेरा मुन्ना भी इस फिल्ड में काम कर रहा है असे सांगितले. याची आठवण करुन दिल्यानंतर तसेच मी त्यावेळपर्यंत 60 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. असे सांगितल्यानंतर बच्चन हे माझ्याकडे अवाक होत पाहत राहिले. हे सांगताच श्रोत्यांनी सचिन यांना उस्फूर्त दाद दिली.

Leave a Comment