नवी दिल्ली – अण्णा हजारे हेच माझे गुरू आहेत. आम्हा दोघांत फूट पडावी म्हणून राजकीय पक्षांतील कांही नेत्यांनी कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत असा आरोप आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एका मुलाखतीत केला आहे.

केजरीवाल म्हणाले की अण्णाच माझे गुरू आहेत. त्यामुळे त्यांना जे वाटेल ते मला बोलू शकतात. माझ्या ह्यदयात अण्णांना जे स्थान आहे ते कधीच हलणार नाही. आमच्यात मतभेद व्हावेत यासाठी राजकीय पक्षांनीच कोट्यावधी रूपये खर्ची टाकले आहेत आणि सर्वच राजकीय पक्षातील दुष्ट प्रवृत्तीचे नेते त्यासाठी एकत्र आले आहेत. संसदेत संमत झालेले लोकपाल बिल अगदी मिळमिळीत असल्याचे केजरीवाल म्हणाले तर या बिलाबाबत अण्णांनी समाधान व्यक्त केले आहे .
केजरीवाल यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्यापासून अण्णांनी त्यांना दूरच केले आहे आणि अण्णांच्या नावाचा उपयोग केल्याबद्दल अण्णांनी त्यांना देाषही दिला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल बोलत होते. दुसरीकडे योगगुरू रामदेव बाबा यांनीही केजरीवाल यांनी गुरूशिष्य परंपरेला हरताळ फासल्याचे मत व्यक्त केले आहे.