शिल्पा शेट्टी ठरली यम्मी मम्मी

जगातील यम्मी मम्मी कोण असेल याचा कांही अंदाज बांधता येतोय ? नाही. मग ऐका!  या विषयावर जगभरातून नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले आहे. यात जगभरात यम्मी मम्मी साठी लोकांना मतदान करण्यासाठी सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे वेगळी स्टाईल आणि फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यात बाजी मारली आहे. ती जगातील यम्मी मम्मी ठरली आहे. लोकांनी तिलाच सर्वाधिक मते दिली आहेत.

शिल्पाला या निकालामुळे आश्वर्याचा धक्का बसला असल्याचे समजते. ती म्हणाली की इतक्या संख्येने मला मते मिळतील याची मी कल्पनाच केली नव्हती. अर्थात यम्मी मम्मी ठरल्याचा आनंद आहेच पण हे सारे श्रेय मी बॅलन्स्ड डायट आणि फिटनेस रूटीनला देईन.