अंटार्टिका मौल्यवान हिर्‍यांचे भांडार

अंटार्टिका खंडावरच्या बर्फाळ पर्वतांत मौल्यवान हिर्‍यांचे भांडार असावे असे ठोस पुरावे वैज्ञानिकांना मिळाले आहेत. पूर्व अंटार्टिका मधील डोगंरात वैज्ञानिकांना ककिंबरलाईट खडक आढळले आहेत. या खडकांतच हिरे दडलेले असतात आणि जेथे जेथे असे खडक आढळतात तेथे विपुल प्रमाणात हिरेही मिळतात.

आजपर्यंत अफ्रिका, सायबेरिया, ऑस्ट्रेलियासह पूर्ण जगात किंबरलाईट खडक म्हणजे हिर्‍यांचे भांडार अशाच दृष्टीने पाहिले जाते. अंटार्टिकावरही हा खडक आढळणे याचा अर्थ येथेही हिरे आहेत असाच आहे. मात्र सध्या अंटार्टिका खंडावर व्यावसायिक कारणासाठी खनिजे शोधण्यावर बंदी आहे. त्यामुळे येथील हिरे लगेच खणून बाहेर काढणे शक्य नाही असेही समजते. ऑस्ट्रेलियातील संशोधकांच्या नेतृत्वाखालील गटाने केलेल्या संशोधनातून अंटिर्टिकावरील किबरलाईट खडकांचा शोध लागला आहे.

Leave a Comment