अॅशेसच्या दुस-या कसोटीत ऑस्ट्रलिया विजयी

अॅ२डिलेड – अॅशेस मालिकेच्या दुस-या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ऑस्ट्रलियाने २१८ धावांनी विजय मिळवला आहे. विजयासाठी ५३० धावांचा डोंगर पार करण्याचे आव्हान ठेवत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला अॅशेस मालिकेच्या दुस-या कसोटी सामन्यात पराभवाचे संकट उभे कले होते आहे. चौथ्या दिवसखेर इंग्लंडचे कंबरडे मोडत सर्व गडी ३१२ धावात बाद करीत विजय मिळवला आहे.

दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने केवळ खेळाची औपचारिकता पूर्ण करत ३ बाद ३१२ धावा काढून इंग्लंडसमोर विजयासाठी ५३० धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात पराभव वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाची अवस्था चौथ्या दिवसअखेर दयनीय झाली होती. पाचया दिवशी ६ बाद २४७ धावावरून इंगलंडचा डाव पुढे सुरु केला असता शेवटचे चार फलंदाज लगेचच बाद झाले. त्यामुळे सलग दुस-या कसोटी सामन्याात दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे.

दुस-या डावात इंग्लंडच्याय फलंदजानी सुरुवात निराशाजनक केली. सलामीवीर अॅ लेस्टर कुक केवळ १ धाव काढून बाद झाल्यानंतर जो. रूट ( ८७) आणि केविन पीटरसन (५३) यांनी अर्धशतके करून डाव सावरण्याोचा प्रयत्नद केला. मात्र सिडलने पीटरसनचा काटा काढला. त्यानंतर रूटला लॉयनने हॅडिनकरवी झेल बाद केले. त्या नंतर इंगलंडच्या फलंदाजानी फारसा प्रतिकार केला नाही; अवघ्या ३१२ धावांत खेळ आटोपला. संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया : पहिला डाव ५७०/९ घोषित, इंग्लंड : पहिला डाव सर्वबाद १७२, ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव १३२/३ घोषित, इंग्लंड : दुसरा डाव ३१२.