मोटर मेकॅनिकने बनविले प्रसूती सुलभ करणारे उपकरण

अर्जेंटिनामधील मोटर मॅकॅनिक जॉर्ज ओडोन याने प्रसूती सुलभ करणारे उपकरण बनविले असून हे उपकरण महिलांसाठी वरदान ठरेल अशी अपेक्षा तज्ञ व्यक्त करत आहेत. जॉर्जचा प्रसूती अथवा वैद्यकीय क्षेत्राशी दुरूनही संबंध नाही मात्र तो पाच मुलांचा बाप आहे. जॉर्जला संशोधनाची आवडच आहे व २००५ सालापासून त्याने मेकॅनिकस, स्टॅबिलायझेशन बार, कार सस्पेन्शन संबंधीची ८ पेटंट मिळविली आहेत.

जॉर्ज प्रसूती सुलभ करणार्‍या उपकरणाविषयी सांगतो की त्याने यूट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला. त्यात काचेच्या रिकाम्या बाटलीत अडकलेले कॉर्क किवा बूच सहजगतीने बाहेर काढताना दाखविले होते. त्यासाठी प्लॅस्टीक बँग बाटली तिरकी करून तिच्यात घातली गेली व ती फुगविली गेली. त्यामुळे बूचाभोवती प्लॅटीकचे आवरण घट्ट बसले व हे बूच सहजरित्या ओढून बाटलीबाहेर काढले गेले.त्यावरूत त्याला प्रसूतीसाठी उपकरण तयार करण्याची कल्पना सुचली.

त्याचा हा विचार त्याने अनेक प्रसूतीतज्ञांना बोलून दाखविला. त्यांनाही कल्पना आवडली व मग जॉर्ज कामाला लागला. प्रथम त्याने उपकरणाचे पेटंट नोंदणी केली. आणि प्रोटोटाईप उपकरण तयार केले. ब्युनर्स आयर्स येथील सेंटर फॉर मेडिकल एज्युकेशन अॅन्ड क्लिनिकल रिसर्च मधील डॉ. झेविअर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी आणखी कांही बदल सुचविले. त्यानंतर योग्य त्या बदलांसह हे उपकरण जागतिक आरोग्य संघटनेला २००८ मध्ये सादर केले गेले आहे आणि आता या उपकरणाच्या चाचण्या सुरू आहेत.

जगात १० पैकी १ मुलाच्या जन्मावेळी तरी फोरसेप्सचा वापर करावा लागतो. यात बाळाच्या डोक्यावर विशिष्ट टोपी बसवून त्याला बाहेर खेचले जाते मात्र अनेकवेळा यात बाळाच्या डोक्याला इजा होण्याची शक्यता असते. जॉर्जच्या उपकरणामुळे हा धोका राहणार नाही आणि महिलांची प्रसूती सुलभतेने होऊ शकेल असे तज्ञांचे मत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment