संजय दत्त आज पॅरोलवर सुटण्याची शक्य‍ता

पुणे: मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त, सोमवारी ३० दिवसांच्या पॅरोलवर येरवडा कारागृहाबाहेर सुटण्याीची शक्यता आहे. पत्नी मान्यता दत्त हिच्या शस्त्रक्रियेसाठी संजय दत्तने सुट्टीची मागणी केली होती. त्याच्या या अर्जावर विभागीय महसूल आयुक्तांनी ही सुट्टी मंजूर केली आहे. सहा डिसेबरला सुट्टी मंजूर झाल्यानंतर संजय दुसऱ्याच तुरुंगातून बाहेर पडणार होता. मात्र पॅरोलची स्लिप न मिळाल्याने त्याची सुटका लांबली होती. दरम्यापन, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही संजयची सुट्टी वैध आहे अथवा नाही याची चौकशी करण्याचं आश्वासन दिले आहे.

संजय दत्तची आजारी असलेली पत्नी मान्यता दत्त संजुबाबाच्या सुट्टीच्या आधी चार दिवस एका फिल्मच्या प्रिमियरमध्ये दिसल्याने त्याच्या सुट्टीवर चारही बाजूने टीका झाली होती. संजय दत्तला जो न्याय तो सामान्य कैद्यांना का नाही असा सवालही विचारला जात आहे. शनिवारी याला विरोध दर्शवित रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी तर तुरुंगाबाहेर आंदोलनही केले होते.

त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही संजयची सुट्टी वैध आहे अथवा नाही याची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. पण तरीही संजय सोमवारी तुरुंगाबाहेर पडण्याची शक्यता आहेत.
दरम्यान, डॉक्टरांनी मान्यता दत्तच्या लिव्हरमध्ये ट्यूमर असल्याचे सांगत या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच संजूबाबाला १४ दिवसांची सुटी देण्यात आली होती.

Leave a Comment