मुंबई – मुंबई सेंट्रल बसस्थानकासमोरील समुद्रा बारवर मध्यरात्री पोलिसांनी छापा घालून 19 मुलींना ताब्यात घेतलंय. या कारवाईत 19 मुलींसह अन्य 29 जणांनाही अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये 15 ग्राहक, 13 वेटर आणि एका मॅनेजरचा समावेश आहे. पोलिसांचा छापा पडल्याची माहिती मिळाल्यावर समुद्रा बारचा मालक फरार झाला.
बारमध्ये तरूणींवर हजारो रूपयांची उधळण केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.. एका एनजीओने या बारमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहितीही पोलिसांना दिली होती.. तेव्हा पोलिसांनी आधी साध्या वेशात बारमध्ये जाऊन बारमधली दृश्य छुप्या कॅमेरात टिपली.. आणि या सर्वांना रंगेहात पकडलं..या बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली फक्त अश्लील नृत्यच नाही तर वेश्या व्यवसायही सुरू होता. याची तक्रार एका एनजीओने केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना यापैकी काहीच आढळून आलं नाही. म्हणजे त्या बारमध्ये मुलीही नव्हत्या किंवा ऑर्केस्ट्राही नव्हता… मग पोलिसांनी या बारमध्ये आपल्या खबर्यामार्फत स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. मग साध्या वेशातील काही पोलीस, पोलिसांचे खबरे यांनी हे स्टिंग ऑपरेशन पार पाडलं. साध्या वेशातील पोलीस या बारमध्ये ग्राहक बनून गेले मग त्याचं स्टिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर आणि बारमध्ये वेश्याव्यवसाय तसंच अश्लील नृत्य चालत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी समुद्रा बारवर छापा टाकला. समुद्रा बारचा मालक मात्र फरार आहे.