मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा कवडासचा अनाथाश्रम संचालक दोषी

मुंबई – शहापूरमधील कवडास आश्रमातील गतिमंदाचं लैंगिक शोषण आणि खून केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आठ आरोपींपैकी पाच जणांना दोषी ठरवलं आहे. उर्वरीत तीन जणांची सुटका करण्यात आली आहे. 2010 मध्ये मुंबईजवळच्या शहापूरमधील कवडास आश्रम या गतिमंताच्या अनाथालयातील मुलांचं लैंगिक शोषण होत असल्याचं उघडकीस आलं होतं.

न्यायालयाने दोषी ठरविलेल्या पाच जणांमध्ये आश्रमाचा मालक आणि चालक पुंडलिक गोळे, त्याची पत्नी साक्षी गोळे आणि अन्य तिघांवर सामुहिक बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक शोषण, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आरोपींनी एकूण सात अल्पवयीन गतिमंद मुली आणि 12 अल्पवयीन गतिमंद मुलांवर अत्याचार केल्याचं त्यांच्यावरील आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलं होतं.

या आश्रमात एकूण 19 मुले आणि मुली यांच्या निवासाची सोय होती. या 19 मुलांमध्ये पाच मुली आणि उर्वरीत 14 मुलं होती. त्या सर्वांवर लैंगिक तसंच मानसिक अत्याचार एवढंच नाही तर त्यांच्या खुनाचाही प्रयत्न झाला होता. खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप कोर्टातील सुनावणीमध्ये एका मुलाने दिलेल्या साक्षीनंतर लावण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आश्रमाचा मालक असलेल्या पुंडलिक गोळे याला अटक केली. त्यानंतर सर्व प्रकरण थंड्या बस्त्यात गेलं.

त्यानंतर माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची सू मोटो म्हणजे स्वतऋहून दखल घेत डीवायएसपी रश्मी करंदीकर यांना या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रश्मी करंदीकर यांनी केलेल्या तपासात आश्रमाचे मालक असलेल्या गोळे पती-पत्नीबरोबरच अन्य सात जणांनी गतिमंद मुलांवर अत्याचार केले आहेत. मग त्या सर्वांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आश्रमातील दोन मुलांचा या अत्याचारामुळेच मृत्यु झाल्याची साक्ष या प्रकरणातील चार पीडित मुलांनी न्यायालयात दिल्यानंतर आरोपीविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला.

Leave a Comment