वेगवेगळ्या वेबसाईटवरील 20 लाख पासवर्डची चोरी

बोस्टन – तुमच्या जीमेल, फेसबुकचा पासवर्ड सुरक्षित आहे का? हा प्रश्न विचारयाचं कारण म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्सवरील तब्बल वीस लाखांपेक्षा जास्त पासवर्ड चोरी करून ते इंटरनेटवर पब्लिश करण्यात आले आहेत. त्यामध्ये जीमेल, फेसबुक, याहू सारख्या इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साईटसचा समावेश आहे. पासवर्डची चोरी ही काही फक्त एखाद्या देशापुरती नसून संबंध जगातील इंटरनेट यूजर्सचा समावेश या 20 लाख पासवर्डमध्ये आहे. ट्रस्टवेव्ह स्पायडर लॅब या संस्थेने केलेल्या संशोधनात पासवर्ड चोरीची बाब धक्कादायक बाब उघडकीस आलीय. नेदरलँडमधील एका इंटरनेट सर्व्हरचा शोध घेताना त्यांना पासवर्ड चोरीचा छडा लागला. सायबर चाच्यांनी ही चोरी केलीय. या सर्व्हरवर त्यांना जगभरातील 90 हजार इंटरनेट साईट्सचे पासवर्ड मिळाले आहेत. हे सर्व पासवर्ड यूजर्सचे असून इंटरनेटवर पोस्ट करण्यात आले आहेत. ट्रस्टवेव्ह स्पायडर लॅबने केलेल्या संशोधनानुसार, या 20 लाख पासवर्डमध्ये सर्वाधिक पासवर्ड हे फेसबुक यूजर्सचे आहेत. फेसबुकच्या जवळपास 326000 यूजर्सचे पासवर्ड चोरी करून ते या सर्व्हरवर प्रकाशित करण्यात आले आहेत.

त्यानंतरचा क्रमांक आहे गूगल अकाऊंटचा… गूगल अकांऊटचे तब्बल 60000 पासवर्ड या सर्व्हरवरून इंटरनेटवर पोस्ट केले आहेत. अलीकडेच गूगलने गूगलवरील सर्वे सेवांसाठी एकच यूजरनेम आणि पासवर्ड देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या 60000 गूगल अकाऊंटमध्ये जीमेल, यूट्यूब, गूगल प्लस, अशा गूगलच्या अनेक सेवा वापरणार्‍या यूजर्सचा समावेश असू शकतो. गूगल पाठोपाठ पासवर्ड चोरी करण्यात आलेल्यांमध्ये याहूचा नंबर लागतो.

याहूच्या जवळपास 59000 वापरकर्त्यांचे पासवर्ड चोरी करण्यात आले आहेत. त्यानंतर ट्वीटर या सोशल नेटवर्किंग साईटचा क्रमांक लागतो. ट्वीटरच्या 22000 यूजर्सच्या पासवर्डची चोरी करण्यात आली आहे. ट्रस्टवेव स्पायडर लॅबच्या मते पासवर्ड चोरी गेलेल्या इंटरनेट यूजर्समध्ये सर्वाधिक अमेरिका, जर्मनी, सिंगापूर आणि थायलंड या देशातील यूजर्स सर्वाधिक आहेत. त्यानंतर अन्य काही देशांचा क्रमांक असल्याचा दावाही स्पायडर लॅबने केला आहे.

सर्व इंटरनेट यूजर्सना दिलासा देणारी बाब म्हणजे, ज्या पॉन्टी बॉटनेट सर्व्हरवर हे लाखो पासवर्ड सापडले आहेत, त्या सर्व्हरच्या मालकी असलेल्या कंपनीला आणि नेदरलँड सरकारला हे सर्व पासवर्ड काढून टाकण्याची विनंतीही ट्रस्टवेव स्पायडरलॅबने केली आहे. स्पायडर लॅबच्या ताज्या ब्लॉगमध्ये या सर्व बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. या ब्लॉगमधील माहितीनुसार इंटरनेट यूजर्स हे पासवर्डला अत्यंत महत्वाच्या बाबीला गांभिर्याने घेत नाहीत. काहीही किरकोळ पासवर्ड ते टाकतात. पायवर्ड टाकताना त्यांची बळकटी म्हणजे स्ट्रेंग्थ पाहणं गरजेचं असतं. स्पायडरलॅबच्या पाहणीनुसार सर्वाधिक पसंतीचा पासवर्ड म्हणजे 123456 असा आहे. 123456 हा अतिशय सोपा पासवर्ड तब्बल 16000 इंटरनेट यूजर्सचा आहे.

त्यानंतरचे सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड म्हणजे झरीीुेीव हा शब्द किंवा Aवाळप किंवा फक्त 1 हा आकडा पासवर्ड म्हणून सर्वाधिक वापरला जातो. पासवर्ड चोरीबाबत हा सर्वात मोठा गौप्यस्फोट झाल्यानंतर फेसबुक आणि ट्वीटरने आपल्या सर्व्हरमधून चोरी झालेल्या यूजर्सचे पासवर्ड रिसेट करून त्यांची सूचना आपल्या अकांऊंट यूजर्सना दिली आहे. या आजवरच्या सर्वात मोठ्या पासवर्ड चोरीबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास गूगलने मात्र नकार दिला. तर याहूचा कुणीही सदस्य स्पायडर लॅबला भेटू शकला नाही. आपल्याकडे एकच पासवर्ड वेगवेगळ्या इंटरनेट साईटसाठी वापरणार्‍यांची संख्याही मोठी आहे, तसंच अनेक इंटरनेट यूजर्स हे आपल्या पासवर्डला गांभिर्याने घेत नाहीत, अनेकांबरोबर पासवर्ड शेअर करतात, त्यामुळेच पासवर्ड चोरीचे प्रकार होत असल्याचं इंटरनेट सुरक्षा जाणकारांना वाटते.