अभिनेता राजपाल यादवला दहा दिवसांची कोठडी

नवी दिल्ली – एका कंपनीकडून घेतलेले कर्ज परत देण्यास असमर्थ ठरल्याने बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला दिल्ली हायकोर्टाने दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजपाल आणि त्याच्या पत्नीवर दाखल असलेल्या पाच करोड रुपयांच्या वसुलीसंदर्भातील याचिकेबाबत हा निर्णय दिला आहे. त्यांच्या पत्नीलाही अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

न्यायालयाने यादव याच्या पत्नीलाही न्यायालयाचे सत्र संपेपर्यंत न्यायालयीन अटक करण्याचे आदेश दिले. राजपाल आणि त्याच्या पत्नीविरोधात पाच करोड रुपयांच्या रिकव्हरीची केस दाखल करण्यात आली होती. ठरवून दिलेल्या वेळेपर्यंत राजपाल यादव पैसे परत देऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर खोटं बोलणे आणि खोटं अॅफिडेव्हिट देण्याचा आरोप लावण्यात आला.

२०१० साली ‘अता-पता-लापता’ या सिनेमाच्या निर्मितीसाठी राजपालने मुरली प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून पाच करोड रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, हे पैसे तो परत देण्यास असमर्थ ठरला. याअगोदर राजपालने न्यायालयात हे पैसे व्याजासहीत परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पैसे परत दिले नाहीत.