कांदे, टोमॅटोनंतर अंडयाचे दर वाढले

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले महागाईचे सत्र काही केल्याअ थांबण्या चे नावच घेत नाही. कांदे, टमाटे आणि आता त्याननंतर अंडी सर्वसामान्यांच्या ताटातून कमी होत आहेत. आतापर्यंत तीन ते चार रुपयांना असणारे एक अंडे पाच ते सव्वा पाच रुपांयवर गेले आहे. त्यामुळे एक डझन अंड्यांचा दर आता ६४ रुपयांवर गेला आहे.

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर आता हेच दर ७० रुपये डझनांवर जाण्याची शक्यता आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत ४० रुपयांपर्यंत सरासरी असणारे एक डझन अंड्यांच्या सामान्य दराची पातळी आता ५५ ते ६० रुपयांपर्यंत असेल, अशी माहिती घाऊक बाजारातल्या व्यापा-यांनी दिली आहे.

आधीच कांदा, टोमॅटोच्या दरवाढीने सामान्य जनता हवालदिल झाला असताना, अंडीही महागली आहेत. होलसेल विक्रीचा शेकडा दर ३०० रुपये असताना तो ४२८ रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे रिटेल बाजारात अंड्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. थंडीत मांसाहाराचा वापर जास्त होत असल्याने अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असं असल्याने अंड्यांचे दरही वधारले आहेत.

Leave a Comment