शाहरुखने ट्विटवर साठ लाख फोलोअर्सचा टप्पा ओलांडला

बॉलीवूडमधील सर्वच अभिनेत्यांना ट्विटवरचे वेड लागले आहे. आता सर्वचजण मुक्त पणे ट्विटवरचा वापर करीत आहेत. कोट़यवधी चाहत्यांचा आवडता अभिनेता बॉलीवूडचा बादशाहा शाहरुखने ट्विटवर साठ लाख फोलोअर्सचा टप्पा आता गाठला आहे. साठ लाख फोलोअर्ससाठी धन्यवाद. या आकड्यापेक्षाही आपले प्रेम वाढत जावो. गणना होणार नाही आणि मोजताही येणार नाही इतका तुम्हाला आनंद मिळो,” या शब्दांमध्ये चाहत्यांच्या प्रेमाने भारावलेल्या शाहरुखने ट्विट केले आहे.

गेल्याक काही दिवसांपासून अभिनेता शाहरूख खानचे SRK6Million, 6MillionSRKiansOnTwitter आणि 6millionssrkians हे तीन टॅग ट्विटरवर आहे. शाहरुखच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्याचे चाहते यांचा वापर करू शकतात. शाहरुखने आमिर आणि सलमान या दोन्ही खान अभिनेत्यांना ट्विटरवर मागे टाकले आहे. यांच्या चाहत्यांची संख्याही लवकरच ५० लाखांवर होईल. त्यारमुळे गेल्या काही दिवसांपासून तो खूपच खूष आहे.

२३ नोव्हेंबरला अमिताभ यांच्या ट्विटर चाहत्यांची संख्या ७० लाखांहून अधिक झाली. त्यावेळी त्यांनी सलमान, आमिर आणि शाहरुख हेदेखील ७० लाखांहून अधिक चाहते असण्याचे पात्र आहेत, असे ट्विट केले होते. बीग बींची ही इच्छा आगामी काळात लवकरच पूर्ण होणार असे दिसत आहे.

Leave a Comment