
मुंबई – सुरत रेप प्रकरणात गुजराथ पोलिसांना हवा असलेला नारायण साई अद्यापी पोलिसांना गुंगारा देत आहे. अशा परिस्थितीत नवीनच माहिती समोर येत असून त्यानुसार नारायण साईने त्याच्या सारख्या दिसणार्या लोकांची एक टीमच तयार केली आहे. देशभरात विविध जागी हे डुप्लिकेट आलिशान मोटारीतून नारायणसाईच्या हुकुमाप्रमाणे फिरतात व लोकांच्या नजरेत भरताच ताबडतोब लपतात. परिणामी लोकांकडून नारायणसाईला पहिल्याच्या खबरा पोलिसांपर्यंत आल्या की पोलिस या डुप्लिकेट साईच्या मागे लागतात. कधी तो सापडतो, कधी सापडत नाही. समजा सापडलाच तर आपली खरी ओळख पटवून तो पोलिसांच्या तावडीतून सुटतो. मात्र तोपर्यतं खरा नारायणसाई पोलिसांच्या नजरेपासून दूरच राहतो असे सांगितले जात आहे.
