अॅपल आयपॅड मिनी व एअर ७ डिसेंबरला लाँच

नवी दिल्ली – अॅपल चे आयपॅड मिनी व एअर येत्या ७ डिसेंबरला भारतात लाँच केले जात असून १६ जीबी वायफाय आयपॅड मिनी २८,९०० रूपयांत तर आयपॅड एअर ३५,९०० रूपयांत ग्राहकांना मिळणार आहेत. कंपनीने ३२,६४,१२८ जीबीच्या किमती अद्यापी जाहीर केलेल्या नाहीत.

आयपॅड एअर ९.७ इंची रेटिना डिस्प्लेसह असून तो फोर्थ जनरेशन आयपॅडपेक्षा २८ टक्के वजनाला हलका आणि स्लीम आहे. गुगलने त्यांचा सेकंड जनरेशन नेक्सस ७ टॅब्लेट भारतात लाँच केल्यानंतर लगोलगच अॅपलने आपली उत्पादने भारतीय बाजारात आणली आहेत. मात्र नेक्सस सात २०,९९९ रूपयांत ग्राहकांना उपलब्ध असल्याने अॅपलला गुगलशी स्पर्धाच करावी लागणार आहे असे जाणकारांचे मत आहे.