सोनिया गांधींचे नांव दिल्याप्रकरणी हफिंग्टन पोस्टची माफी

नवी दिल्ली – जगातील सर्वाधिक श्रीमंत वीस लोकांच्या यादीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नांव दिल्याप्रकरणी हफिंग्टन पोस्टने माफी मागितली असून सोनिया गांधी यांचे नांव या यादीतून काढून टाकण्यात आल्याचे कळविले आहे. सोनिया गांधींचा समावेश जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत करून त्याची संपत्ती १२ हजार कोटींहून अधिक असल्याचे हफिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केले होते. त्यावरून मोठाच वाद मिर्माण झाला होता.

हफिंग्टन पोस्टने या संदर्भात आमचे संपादक सोनिया गांधी यांच्या संपत्तीबाबतची खात्री करून घेऊ शकले नाहीत असा खुलासा केला असून झाल्याप्रकरणाबद्दल माफी मागितली आहे. सोनिया यांच्याबरोबरच कतारचे माजी अमीर हमिद बिन खलिफा अल शमी यांचे नांवही या यादीतून कमी केले गेले आहे. कारण २०१३ मध्ये हमीद यांच्या मुलाची संपत्ती त्यांच्यापेक्षा अधिक झाली असल्याने अमीर हमीद यांचे नांव काढून टाकण्यात आल्याचा खुलासाही केला गेला आहे.