बॉलीवूडमध्ये विविध भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री विद्या बालन नावाजली जाते. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहाणी’, ‘घनचक्कर’ या सिनेमामध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता आगामी काळात येत असलेल्या ‘बॉबी जासूस’ या सिनेमामध्ये विद्या बालन हेराच्या भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमात हेराची भूमीका करीत आहे म्हसणताना विद्याला त्यासाठी आता वेगवेगळी रुप धारण करावी लागणार आहेत. आगामी काळात येत असलेल्या अभिनेत्री दिया मिर्झाच्या फ्री एन्टरटेन्मेंटअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमात विद्या बालन हैद्राबाद स्थानकाबाहेर असलेल्या भिका-याच्या रुपात दिसणार आहे. हा सीन नुकताच शुट करण्यात आला असून विद्याने लगेचच भिका-याच्या रुपातील तिचे एक छायाचित्र ट्विट केले आहे.
त्या सोबतच आगामी काळात येत असलेल्या ‘बॉबी जासूस ‘ या सिनेमामध्ये विद्या ‘फुकरे ‘ या सिनेमाच्या माध्यगमातून प्रसिद्धिस आलेल्या अली फझलसोबत काम करीत आहे. या सिनेमात विद्या अली फझलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. समर शेख दिग्दर्शित हा सिनेमा २०१४ मध्ये प्रदर्शित होईल. विद्याच्या हटके असलेल्या ‘बॉबी जासूस ‘ या सिनेमाकडे आतापासूनच सर्वांचे लक्ष लागले आहे.