आरुषीवर सिनेमा किंवा पुस्तक लिहण्यास परवानगी नाही

नवी दिल्ली – गेल्यात काही दिवसांपासून आरुषी आणि हेमराज या दुहेरी हत्याकांडप्रकरणी तलवार दांम्पत्य तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आगामी काळात कोणासच आपण आरुषीवर सिनेमा किंवा पुस्तक लिहण्यास परवानगी देणार नाही. तसेच, जर कोणी यावर आगामी काळात सिनेमा किंवा पुस्तक काढण्यानचा प्रयत्नस केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तलवार दांम्पत्याच्या वकिलाने सांगितले आहे.

याविषयी असलेली तलवार कुटूंबाची भूमिका स्पष्टं करताना त्यांचे वकिल मनोज सिसौदिया म्हणाले, ‘मीडियाच्या बातम्यांमुळे तलवार दांम्पत्य दुःखी आहे. आरुषी प्रकरणी हॉलीवूड किंवा बॉलीवूडच्रूाि कोण्याे् च निर्मात्या‍ला ते सिनेमा बनवण्याची परवानगी देणार नाहीत. राजेश आणि नुपूरचे आरुषीवर खूप प्रेम होते. त्यांच्या लाडक्या मुलीच्या हत्येवर पैसा कमविण्यासाठी सिनेमा काढला जात आहे या बातमीने ते दुःखी आहेत.’ जर त्यांच्या परवानगीशिवाय सिनेमा काढला तर संबंधित निर्देशक आणि लेखकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पंष्ट केले.

गाजियाबाद विशेष सीबीआय न्यायालयाने तलवार यांना दोषी ठरवल्यानंतर काही निर्माते या प्रकरणी सिनेमा काढण्यास इच्छुक असल्याची बातमी माध्यमांमध्ये होती. लंडनचे एक लेखक आणि सिनेमा निर्माते क्लिफ रूनयार्ड यांनी आरूषि-हेमराज दुहेरी हत्याकांडावर सिनेमा तसेच पुस्तक लिहिण्यासाठी दासना जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या डॉ. राजेश आणि नुपूर तलवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तुरूंगातील नियमांमुळे त्यांना तलवार दांम्पत्याला भेटता आले नाही.

Leave a Comment