रितिक रोशन-सुजैनच्या संबधात दरारच

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रितिक रोशन आणि त्याची पत्नी सुजैन यांच्या व संबधात पडलेली दरार अजूनही कायमच आहे. काही दिवसांपूर्वी सुजैनचे रूप पा‍हता ती रितिककडे परतण्याबाबत गांर्भियाने विचार करीत नसल्याचे पुढे आले आहे. दोघांच्या संबधाबाबत बोलण्यास कोणीच तयार नसल्याने संबधातील दरार दोन महिने उलटून गेले तरी अजूनही कायमच आहे.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार, सुजैन आता रितिककडे परत जाण्याचा विचार करीत नाही. गेल्याय दोन महिन्यांपासून ती पैरंट्स संजय खान आणि जरीन खान यांच्या सोबत राहत आहे. तिचे दोन मुले अजूनतरी रितीककडेच आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या मतभेदावरून दोघातील संबध बिघडले असल्याची जाणीव झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका इवेंटमध्ये रितिक आणि सुजैन दोघांना जायचे होते. मात्र त्या ठिकाणी रितीक एकटाच पोहचला. सुजैनने त्या‍ इवेंटमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शविला.

सुजैन काही दिवसांपूर्वीच सासरे राकेश रोशन यांच्या बर्थडे सेलिब्रेशनला हजर होती. थोड़या वेळासाठीच ती पार्टीत सहभागी झाली होती. त्यानतर ती पार्टीतून निघून गेली. रोशन फैमिलीच्या मते सुजैन तिच्या पैरंट्स आजारी असल्याने लवकर निघून गेली. मात्र गेल्या काही दिवसांपासून रितिक प्रत्येक कार्यक्रमात एकटाच सहभागी होत असल्याने दोघेजण विभक्त झाली असल्याची चर्चा मात्र सर्वत्र जोरात सुरू आहे.