जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल यांना यंदाचा इंदिरा गांधी पुरस्कार

नवी दिल्ली -शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार यंदाच्या वर्षी जर्मनीच्या चॅन्सेलर अॅंजेला मर्केल यांना जाहीर झाला आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युरी समितीने या पुरस्कारासाठी मर्केल यांची निवड केली असल्याचे इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे जाहीर करण्यात आले आहे.

ट्रस्टतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार ५९ वर्षीय मर्केल यांनी युरोपातील आर्थिक संकटकाळात युरोपचे केलेले नेतृत्त्व आणि जर्मनीच्या आर्थिक विकासासाठी केलेले विशेष प्रयत्न तसेच जागतिक स्थैर्यासाठी त्या करत असलेले काम, जागतिक शांततेसाठीचे त्यांचे योगदान व भारत व अन्य विकसनशील देशांसोबत त्यांनी जपलेले नातेसंबंध यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.

Leave a Comment