सातार्‍यात गर्भलिंग चाचणी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

सातारा – सातारा जिल्ह्यात गर्भलिंग चिकित्सा करणारं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. बनावट दाम्पत्यांच्या साह्याने सातार्‍यात हा काळा धंदा सुरू होता. डॉक्टर गर्भवती महिलांना एक व्हॅनमध्ये सोनाग्राफी करत. त्यातच मुलगा होणार की मुलगी हे सांगण्यासाठी बर्फी आणि पेढा हे शब्द वापरले जात. त्यामुळे व्हॅनमध्ये सुरू असलेला हा काळा उद्योग जेव्हा समोर आला, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याप्रकरणी मुंबईच्याही एका डॉक्टरचा शोध सुरू आहे. सातार्‍यातल्या म्हसवडच्या डॉ दिलीप राजगे याला सोनोग्राफी मशिनसह ताब्यात घेतलं आहे.