टाईम मॅगॅझिनकडून सचिनला पर्सन ऑफ द वीक

अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मॅगॅझिनने नुकत्याच घेतलेल्या ऑनलाईन पोलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला वाचकांची सर्वाधिक मते मिळाली असून त्याला पर्सन ऑफ द वीक म्हणून गौरविले गेले आहे. सचिन बरोबरच या गौरवासाठी चीनचे पंतपअधान शि जिंगपिंग आणि यूएस फेडरल रिझर्व्ह प्रमुखपदासाठीच्या नॉमिनी जेनेट येलेन यांचीही नांवे होती. मात्र वाचकांनी सचिनला ८८ टक्के मते दिली. चीन पंतप्रधानांना १३.४१ टक्के तर येलेन यांना ६ टक्के मते मिळाली.

सचिन त्याच्या निवृत्तीपूर्वीची शेवटीची कसोटी वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरूद्ध खेळत आहे. या कसोटीत सचिनने ७४ धावा काढल्यानंतर टाईम मॅगेझिनने त्याला पर्सन ऑफ द मोमेंट म्हणून जाहीर केले होते. व १० नोव्हेंबरच्या आठवड्यासाठी वाचकांना पर्सन ऑफ द वीकसाठी ऑनलाईन मतदान करण्याचे आवाहनही केले होते. त्याच्या प्रतिसादात वाचकांनी सचिनची निवड केली आहे.