कर्नाटकात अंधश्रद्धाविरोधी कायदा

बंगळूर – ङ्गलज्योतिष, भानामती, जादूटोणा आणि मडेस्नानासारख्या अनुचित प्रथांच्या विरोधात कायदा करण्याचा विचार कर्नाटक सरकार करत आहे. या कायद्याचा मसुदा काय असावा यावर राज्यातल्या काही विद्यापीठातील अभ्यासकांनी एक अहवाल तयार केला असून तो अहवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना येत्या पाच नोव्हेंबरला सादर केला जाणार आहे.

या अहवालाच्या आधारे अंधश्रद्धाविरोधी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून नॅशनल लॉ स्कूल ऑङ्ग इंडिया युनिव्हर्सिटीच्या मदतीने तो शब्दबद्ध करण्यात आला आहे. तोही या अहवालासोबत मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल. कर्नाटकातील अंधश्रद्धाविरोधी चळवळीचे कार्यकर्ते जी. रामकृष्ण आणि त्यांच्या सहकार्‍यांनी राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा करावा अशी मागणी केली आहे.

कर्नाटकात काही अंधश्रद्ध लोक आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मनुष्यबळी देतात. त्याशिवाय राज्यातल्या काही देवस्थानांमध्ये मडेस्नानाची प्रथा रुढ आहे. या प्रथेत लोक ब्राह्मणांनी खाऊन टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीवर लोळतात. ते अन्न शरीराला लागल्यामुळे चर्मरोग नष्ट होतात अशी त्यांची कल्पना आहे. अशाच पद्धतीने अजालू नावाची एक प्रथा आहे. त्या प्रथेत तर काही लोक विष्ठा, नखे आणि केससुद्धा खातात.

कर्नाटकात वास्तूशास्त्राच्या नावाने सुद्धा लोकांची लूट केली जाते. वास्तू लाभावी म्हणून नग्नपूजा केली जाते. त्याशिवाय ओकुली नावाच्या प्रथेमध्ये महिलांच्या अंगावर पाण्याचे ङ्गवारे सोडले जातात. अशा प्रथा बंद करण्याची तरतूद या विधेयकाद्वारे कायद्यात केले जाणार आहे.