भाजपाशी मैत्री करण्यास तयार – मुलायमसिंग

लखनौ – देशात तिसर्‍या आघाडीची बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनी काही अटींवर भारतीय जनता पार्टीशी युती करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. भारतीय जनता पार्टीने आपली काही धोरणे बदलली तर समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांचे एकत्रीकरण होऊ शकते, असे यादव यांनी म्हटले आहे.

भविष्यात होणार्‍या आगळ्या वेगळ्या युतीचे सूतोवाच करतानाच मुलायमसिंग यादव यांनी भाजपाला काश्मीर, अयोध्या आणि मुस्लीम समाज यांच्यासंबंधीची आपली धोरणे बदलावीत असे आवाहन केले. भाजपाच्या या विषयावरील धोरणामुळेच समाजवादी पार्टी भाजपापासून ङ्गटकून राहते असे ते म्हणाले.

मुझफ्ङ्गरनगर येथील जातीय दंगलींमध्ये भाजपा आणि समाजवादी पार्टी यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी ङ्गेटाळला. कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेल्या काही जातीयवादी संघटनांनी ही दंगल पेटविली असल्याचे ते म्हणाले. अखिलेश यादव यांच्या सरकारने उत्तर प्रदेशात उत्तम काम केले असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment