केवाडिया – केवाडिया येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठ्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पायाभरणी समारंभ गुजरातचे मुख्यीमंत्री नरेंद्र मोदी यांच्याय हस्तेी करण्या त आले. यावेळी बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हरणाले की, महान नेता हा फक्त एका पक्षाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा असतो, त्यांचा संबंध फक्त एका पक्षाशी जोडणे हा त्यांच्या महानतेचा अपमान असल्याचे वक्तव्य करत त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांवर हक्क सांगणा-या काँग्रेसला टोला हाणला आहे.
एका कार्यक्रमात प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी ‘सरदार पटेल’ हे एक सेक्युलर नेते होते असे म्हटले होते, त्या वाक्याचा मला अभिमान वाटतो असे सांगत देशाला सरदार पटेलांच्या सेक्युलरिझमची गरज आहे, व्होटबँकेच्या राजकारणाची नव्हे असाही टोला हाणला. सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण करण्यास केंद्र सरकारमुऴे अडचणी येत असल्याचा आरोप करत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.
सरदार सरोवर धरणातून आदिवासींना पाणी पुरवठा केला जाईल. या प्रकल्पामुळे शेतकरी व आदिवासींना अडचणी येणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. भारताला जगात एक स्थान निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी चीन व जपानचा दाखला यावेळी मोदीनी दिला.