अभिषेक-ऐश्वर्याने घेतले जाहिरातीसाठी ३० कोटी

बॉलिवुडचे फेमस कपल असलेल्या अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन या जोडीने एका जाहिरातीसाठी ३० कोटी रूपये घेतले आहेत. त्या‍मुळे हे कपल आता बॉलिवुडमधील सर्वात जास्त फीस घेणारे हे कपल ठरले आहे. सैफ-करीना आणि अक्षय-ट्विंकल या जोडीला देखील त्याने फीस घेण्याच्या बाबतीत मागे टाकून एक नंबर जोडी झाली आहे.

बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्वर्या रॉय पूर्वीपासून जाहिरातीसाठी जादा मानधन घेते. मात्र यावेळेस दोघाच्या जोडीने किचनशी निगडीत असलेल्या ब्रैंडसाठी सर्वाधिक मानधन घेले आहे. त्यामुळेच कंपनीने सुध्दा दोघांच्या जोडीसाठी सर्वाधिक पैसा दिला आहे. आगामी काळात लवकरच ही जोडी या जाहिरातीचे शूटींग करणार आहे.

पहिल्यांदाच हे बॉलिवुड कपल जाहिरातीच्या माध्‍यमातून एकत्र झळकणार आहे. यापूर्वी बॉलीवूडमधील शाहरुख-गौरी या जोडीने एका कंपनीच्याा जाहिरातीसाठी १८ कोटी घेतले होते. त्यायनंतर सैफ-करीना या जोडीने एका जाहीरातीसाठी १० कोटह रूपये मानधन घेतले होते. त्याे तुलनेत सर्वाधिक मानधन अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन या जोडीने घेतले आहे.

Leave a Comment