नवी दिल्ली – यंदाच्या दिवाळीत सामान्यांना एक सुखद धक्का मिळण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 1 रुपयाने कपात करण्याची शक्यता वर्तवली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तसेच रुपयाच्या स्थिरतेमुळे तेल कंपन्यांनी हे सुतोवाच केले आहे.
हा सुखद धक्का दिवाळीच्या आधीच सामान्यांना अनुभवता येणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच पेट्रोलच्या किमतीत 3 रुपयाने कपात करण्यात आली होती. मे महिन्यानंतर पहिल्यांदाच पेट्रोलची किंमत कमी करण्यात आली होती. ही कपात गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठी कपात होती. तर दुसरीकडे मात्र डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.